नियम डावलणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

  • दोन दिवसांत 45 हजार रुपयांची

कामशेत – कामशेतमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तसेच अपघात संपत टाळण्यासाठी वाहतूक नियम डावलून वाहन चालविणाऱ्यांवर कामशेत पोलिसांनी कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

सोमवारी (दि. 3) ते रविवारी (दि.9) या सात दिवसांच्या काळात कामशेत पोलिसांनी 161 जणांवर कारवाई करीत 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे . ही कारवाई करताना पोलिसांनी, कागदपत्रे सोबत न बाळगणे, रहदारीस अडथळा, ट्रिपलसिट, सीटबेल्ट न लावणे, नो-पार्किंग, विना लायसन, लेन कटिंग, काळ्या काचा, विना हेल्मेट, दारू पिऊन वाहन चालविणे आदी नियम डावलणाऱ्या चालकांवर धडक कारवाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कामशेत बाजारपेठेत सणांच्या व उत्सवांच्या काळात प्रचंड गर्दी असते, यामुळे बाजारपेठेत दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण होते; यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो, तसेच कामशेतमधील शाळकरी मुले रुग्ण व स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी कामशेत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी नीलकंठ जगताप यांनी कामशेत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अनधिकृत टपऱ्या हटवून त्याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे कामशेत बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय टाळणार असून, यामुळे वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे. तसेच बाजारातील रस्त्यावर वाहने लावतात.

कामशेत मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील टपऱ्या उठवल्यांमुळे हातावर पोट भरणाऱ्या टपरी चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. पण त्यांना देखील पोलिसांनी बाजारपेठेतील रिकाम्याजागी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यास मदत केली आहे. चौक मोकळा केल्याने पार्किंगची व्यवस्था उत्तम झाली आहे. पण या रिकाम्या जागी व्यापाऱ्यांनी आपली मोठी वाहने लाऊन जागा आडून धरल्यास या पार्किंगचा इतरांना उपयोग होणार नाही, यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)