नियमाप्रमाणे स्वीकृत नगरसेवक निवड करा

पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. ही निवड योग्य नियमांप्रमाणेच करावी, अशी मागणी भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.

आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात तीन स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. ही निवड करताना शासकीय निकष ठरविण्यात आले आहेत. यामध्ये संबंधित व्यक्‍तीची संस्था धर्मादाय आयुक्‍ताकडे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. त्या संस्थेचे ऑडिट पूर्ण हवे, असा नियम असतानाही संस्थेच्या पात्र कार्यकर्त्यांना डावलून विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली जाते. त्यामुळे सामाजिक संस्थेचा पदाधिकारी यापासून वंचित राहत आहे.

स्वीकृत सदस्यपदाचे अर्ज दिले जातात. त्याची माहिती देखील मिळत नाही. त्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या संस्थांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ही निवडणूक पारदर्शीपणे राबविणे गरजेचे आहे. महाराष्ट्र महापालिकेच्या अटी, नियम व शर्ती या कायद्यानुसार नियमाप्रमाणे स्वीकृत सदस्याची निवड करावी, अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. अध्यक्ष राहुल वडमारे, सुरेंद्र जाधव, पंडित किर्ते, आनंद साळवे, चंद्रभान गायकवाड, नसरिन शेख, रवींद्र जाधव आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)