निम्म्या बालकांचे दात किडलेलेच…

नॅशनल ओरल हेल्थ सर्व्हेनुसार पाच वर्षांपर्यंतच्या 50 टक्के बालकांचे दात किडलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि बाटलीतून देण्यात येणारे दूध व गोड पदार्थ हीच त्याची प्रमुख कारणे आहेत. वाढते शहरीकरण व रेडिमेड फूड प्रोडक्‍टस्‌’चा वाढता वापर हेदेखील त्यामागचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारण ठरत आहे. सद्यस्थितीत शहरीकरण झपाट्याने वाढत आहे.

आजकाल आई-वडील नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच बालसंगोपनामध्ये अनेक बदल झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून बाटलीतून दूध बालकांना देण्याचे प्रमाण वाढले आहे. दूधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ पावडर’ मिसळून बालकांना दिले जाते. त्याचबरोबर बाजारातील वेगवेगळे गोड अन्न पदार्थ खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे तोंडातील व दातांवरील ड्रायनेस’ वाढून दात किडतात.

बालकांना बाटलीतून दूध न देता चमचा-वाटी, ग्लासमधून द्यावे. साखरेचे पदार्थ देऊ नयेत, निदान कमीत कमी द्यावेत. रोज दोनदा ब्रश करावा आणि अगदी एका वर्षाच्या बालकाकडूनही दोनदा ब्रश करून घ्यावा. सहा महिन्यांतून एकदा बाल दंतचिकित्सकाकडून बालकांच्या दातांची तपासणी करून घ्यावी. किडलेल्या दातांवर रूट कॅनॉल’ची ट्रिटमेंट करावी, गरजेनुसार फिलिंग’ करावे. तसेच किडलेल्या दातांशेजारची दाते किडू नये, यासाठी फ्लारोईड ट्रिटमेंट’ करून घ्यावी.

या पंचसूत्राचा वापर केल्यास बालकांचे दंत आरोग्य उत्तम राहील. बहुतेक सर्व आजारांचे लक्षण हे तोंडामध्ये दिसून येते आणि त्यामुळेच दर सहा महिन्यांनी दंत आरोग्याची तपासणी करून घ्यावी. तोंडामध्ये काही वेगळे लक्षण दिसल्यास किंवा कुठलीही शंका आल्यास दंतचिकित्सक सांगू शकतो आणि त्यानुसार पुढील निदान चाचण्या व उपचार सुरू होऊ शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)