निमोणे-करडे-न्हावरे रस्त्यांवर खड्डेच खड्डे

निमोणे- येथील निमोणे- करडे तसेच करडे-न्हावरे रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले असून या रस्त्यांवर जडवाहतूक मोठ्यया प्रमाणात चालत आहे. या खड्डयांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याला “अच्छे दिन’ कधी येणार? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. निमोणे-करडे या रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असे आढळते. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे असून साईटपट्ट्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दोन चारचाकी वाहने समोरासमोर आल्यावर एकमेकांना साईट देता येत नसल्याने अनेकवेळा भांडणे होतात. त्यामुळे या रस्त्याने वाहन चालवणे कठीन होऊन बसले असून दुचाकी वाहन चालवताना अनेक वेळा अपघात घडले आहेत. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी करडे ग्रामस्थांनी आणि वाहनचालकांनी केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)