निमोणेत वाळू वाहतुकीवरून दोन गटात हाणामारी

निमोणे- येथे वाळू वाहतुकीच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली असून विकास ऊर्फ बापू विलास होळकर आणि भरत भाऊसाहेब काळे या दोघांनीही शिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या वाळू वाहतुकीला नक्की कुणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, बापू होळकर याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भरत भाऊसाहेब काळे हा ट्रॅक्‍टरने घोड नदीतून वाळू वाहतूक करत होता. ज्या रस्त्याने तो वाळू वाहतूक करत होता. तेथे आमची आणि चुलत्याची सामाईक पाईपलाईन असल्याने ती फुटत आहे. तू येथून ट्रॅक्‍टर नेऊ नकोस, असे बापू होळकर याने भरत काळे याला सांगितले. परंतु भरत काळे याने ‘मी इथूनच ट्रॅक्‍टर नेणार’ असे म्हणत शिवीगाळ करुन डोक्‍यात दगड मारला. तसेच राजेंद्र भाऊसाहेब काळे आणि कैलास भाऊसाहेब काळे यांनी मला मारहाण केली आहे, असा उल्लेख फिर्यादीत बापू होळकर यांनी केला आहे.
तर, भरत काळे याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, घोडनदी पात्रालगत गट नंबर 454 मध्ये आमची वडिलोपार्जित जमीन असून बापू होळकर, अमित कैलास होळकर आणि रमेश पोपट होळकर हे घोड नदीतून वाळू आणून आमच्या जमिनीत साठा करुन ठेवत होता. त्यावेळी त्याला आमच्या जमिनीत वाळू साठा करु नका. ही आमची जमीन आहे, असे त्याला सांगितले. परंतु बापू होळकर याने “आम्ही इथंच वाळू खाली करणार’ असे म्हणत शिवीगाळ करत माझा भाऊ राजेंद्र काळे याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मी त्यामध्ये पडलो असता लोखंडी गज माझ्या डोक्‍यात मारला, असा फिर्यादीत उल्लेख भरत काळे यांनी केला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे आणि पोलीस हवालदार अविनाश गायकवाड करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)