निमाच्या अध्यक्षपदी डॉ. दातखिळे तर कोषाध्यक्षपदी डॉ. लांडगे

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथील डॉ. हेमंत दातखिळे यांची नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी, तर डॉ. शरद लांडगे यांची कोषाध्यक्षपदी आणि सचिवपदी डॉ. अनमोल बोरकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे प्रवक्ते डॉ. पवन सोनवणे यांनी दिली. याप्रसंगी डॉ. हेमंत वाघोलीकर, डॉ. अजिंक्‍य तापकीर, डॉ. धनंजय लोंढे, डॉ. अतुलकुमार बेंद्रे, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, डॉ. यश घोडे, डॉ. उमेश लुणावत, डॉ. कोंडिबा सोनवणे, डॉ. शरद जाधव, डॉ. संदीप वाव्हळ, डॉ. विनायक कावरे, डॉ. राहुल पाटील, डॉ. गांधी, डॉ. शिंदे यांसह इतर मान्यवर, तसेच शिरूर तालुका नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. सुनील ढमढेरे यांनी काम पहिले, निवडीनंतर उपस्थितांच्या वतीने डॉ. दातखिळे आणि डॉ. लांडगे यांचा सत्कार करण्यात आला, यानंतर बोलताना शिरूर तालुक्‍यातील डॉक्‍टरांना संघटित करून त्यांच्या अडचणी सोडविणार असल्याचे डॉ. दातखिळे आणि डॉ. लांडगे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवन सोनवणे यांनी केले, तर डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)