निमसाखर शाळेचा झाला “उकिरडा’

निमसाखर – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 96 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचे शिक्षकांकडून ज्ञानदानाचे काम चांगले होत असले तरी क्रिडांगणावर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे आरोग्य बिघडले आहे.
निमसाखर हे साडेपाच हजार लोकसंख्या असलेले आणि राजकीय दृष्या वजनदार गाव म्हणून परिसरात ओळख आहे. या भागातील अनेक राजकीय व्यक्‍ती, वकील, डॉक्‍टरांसह अनेक शासकीय पदांवर विराजमान असलेल्यांनी याच शाळेतून शिक्षणाची शिजोरी घेऊन या पदापर्यंत मजल मारली आहे. या जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्वी विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती आणि त्यावेळी खासगी शाळेचा पर्याय नव्हता तसा पर्याय आज उपलब्ध आहे, यामुळे सध्या या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा याचबरोबर भागातून उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत या हेतुने शाळेसाठी 6 एकर क्षेत्र क्रिडांगण आहे. मात्र, या क्रिडांगणावर परिसरातील नागरिकांनी कचरा टाकून एकप्रकारे उकिरडाच केला आहे. तसेच शाळेत पाण्याचा अभाव असल्याने स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने शिक्षकांह विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. लहान विद्यार्थ्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी येत नसल्यामुळे शिक्षकांना लगतच्या टाकीचे पाणी भरावे लागत असल्याने ज्ञानदानापेक्षा इतर कामांचा बोझा शिक्षकांवर पडल्याने त्याचा परिणाम ज्ञानदानावर होत असल्याने गुणवत्ता घसरत आहे.

  • या परिसरात सूचना करुनही शाळेच्या क्रिडांगणावर केरकचरा टाकला जात आहे. या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीला कळवले आहे. तसेच जुन्या पडझड झालेल्या स्वच्छतागृह परवागी घेऊन जमीनदोस्त केले जाईल. यातीलच काही स्वच्छतागृहांची नुकतीच दुस्ती करुन वापर केला जात आहे. नागरिक, ग्रामपंचायत अन्य घटकांच्या माध्यमातून शाळा परिसरात कायपालट करुन संरक्षण भिंतीचे काम करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न शासन दरबारी सुरू आहे.
    – पंकज भुजबळ, मुख्याध्यापक, निमसाखर प्राथमिक शाळा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)