निमसाखर येथील वॉल्ह चेंबरची दुरवस्था

निमसाखर- गावातील वार्ड क्र.4 कडे जाणाऱ्या वळणावर तो पाणी पुरवठ्या करणाऱ्या चौकातील वॉल्ह चेंबरची दुरवस्था झाली असून याच भागात विद्युत खांबावरील बल्ब गेला असल्याने येथे अंधार पसरला आहे. ही अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासूनची आहे. तर ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असून संबंधितांकडून आश्‍वासनच दिले जात असल्यामुळे संताप व्यक्‍त होत आहे.
निमसाखर हे गाव साडेपाच हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावामध्ये ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणावर विकास कामे केल्याचा दावा संबंधित पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, निमसाखर गावातून सिंमेट रस्त्यांनी पुढे जात मराठा चौक, पवार आळी, जुनी चावडी व दलीत वस्तीकडे जाणाऱ्या चौकातील पाणी पुरवठा चेंबरची दुरवस्था गेली अनेक महिन्यापासून आहे. याचबरोबर या भागातील नागरिकांना या भागातील परिस्थितीची माहिती असल्यामुळे या ठिकाणचा बल्ब नसल्यामुळेही अंधारात वर्दळ सुरु असते. मात्र, या भागात नवखे पाहुण्यांबरोबर मद्यपी या भागातील अंदाज न आल्याने जखमी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या भागातील नागरिकांनी या धोक्‍याविषयी संबधितांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना माहिती वेळोवेळी दिली. मात्र, आश्‍वसनाशिवाय काहीच मिळाले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच गावचा पीरसाहेब यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तातडीने या परिसरातील पाणी पुरवठ्याच्या वॉल्ह भागात नव्याने सिंमेट नळी टाकुन चेंबर तयार करावे. याचरोबर या ठिकाणी बल्ब बसवण्या बरोबरच या भागातील सिंमेट रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

  • गावातील तीन ठिकाणी सार्वजनिक वॉलभागाची दुरवस्था झाली असुन यासाठी आवश्‍यक असणारी साधन सामग्री उपलब्ध केली आहे.या मुळे दोन ते तीन दिवसात प्रत्यक्ष काम करणार असून सिमेंट रस्त्याबाबत ग्रामपंचायतीने प्रस्ताव संबंधित विभागाकडे दाखल केला आहे.
    – भगवान कोकरे, ग्रामसेवक, निमसाखर
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)