निमसाखर परिसरात टगेगिरी, चोऱ्या वाढल्या

प्रशासनाचे दुर्लक्ष : शिवसेनेने दिला उपोषणाचा इशारा

निमसाखर- निमसाखर (ता. इंदापूर) येथील वर्दळीच्या चौकात वाढलेली टगेगिरी, छेडछाडीचे व चोरीचे प्रकार वाढले असूनही ग्रामपंचायत काहीही उपयायोजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरी ग्रामपंचायतीने त्वरीत उपाययोजना केल्या नाही तर ग्रामपंचायती समोर 1 डिंसेंबर पासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
निमसाखर व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून छोट मोठ्या चोऱ्यांचे प्रकार घडले आहेत. यात दागिने, पैसे, मोटरी, शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे असो की गरिबांची गाय म्हणून ओळख असणाऱ्या शेळ्यांची चोरीचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर छेडछाडीचे प्रकार सातत्याने घडत असून यात चौकात फ्री स्टाईल हाणामाऱ्यांचेही प्रमाण बस स्थानक व परिसरातील असून त्याला आळा बसावा, तसेच निमसाखर परिसरात सीसीटिव्ही बसवण्याची मागणी होत आहे तरी प्रशासनान त्याकडे लक्ष देत नाही. तरी निमसाखर चौक, अकलूज-वालचंदनगर रस्स्ता, बस स्थानकाशेजारी व बाजारतळा जवळ त्वरीत सीसीटिव्ही व अधिक क्षमतेचे वीज दिवे बसविल्यास रात्रीच्या चोऱ्या रोखणे शक्‍य होणार आहे. निमसाखर गावाच्या चौकामध्ये एकही सार्वजनिक शौचालय नसल्यानेही सगळ्यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे चौकामध्ये शौचालय असणे अत्यंत आवश्‍यक आहे, तरी या मागण्यांकडे ग्रामपंचायतीने त्वरीत लक्ष देऊन अंमलबजावणी करावी अन्यथा निमसाखर ग्रामपंचायती समोर शिवसेनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी सुदर्शन रणवरे यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)