निमसाखरला डासांची पैदास

डबक्‍यात रॉकेल किंवा ऑईल टाका

निमसाखर- ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून फॉगिंग मशीन खरेदी केली असून महिन्यांतून एकदा सर्वत्र धुरळणी करण्यात येते. परंतु, ही मशीन सध्या बंद अवस्थेत असल्याने किटकांचा उपद्रव वाढला असून अवकाळी पावसामुळे गाव परिसरात पाण्याची डबकी साचल्याने डासांचे प्रमाणही वाढले आहे. फॉगिंग मशीन दुरूस्ती होत नसेल तर डासांची पैदात डबक्‍यात वाढू नये याकरिता त्यात रॉकेल किंवा ऑईल टाकण्याचा उपाय करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
निमसाखर (ता. इंदापूर) येथे व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर डेंग्यू सदृश्‍य रुग्ण अढळून आले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने धुरळणी करावी तसेच निरवांगी प्राथमीक आरोग्य केंद्राकडुनही तातडीने उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्यातील अनेक गावांपैकी निमसाखर हे मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे.पूर्वी गाव परिसरात अस्वच्छता व काटेरी झुडपांचे साम्राज्य होते. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहिम राबविल्याने काटेरी झुडपे काढण्यात आली. मात्र, अद्यापही रस्त्याकडेला गवत, कचरा आढळून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे जशी ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे, तशी खासगी जागेवर स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी नागरिकांवरही आहे. याकडे काहींकडून दुर्लक्ष केले जात असल्याने गावच्या स्वच्छतेत बाधा येत आहे. सध्या, अवकाळी पावसामुळे गावात ठिकठिकाणी पाणी साठले आहे, अशा डबक्‍यांमध्ये डासांची पैदास वाढत आहे. त्यातच सध्या रात्रीची थंडी, पहाटे दव आणि दुपार कडाक्‍याचे ऊन, असे वातारवण आहे. यातून हवेतील संसर्गामुळे अंगदुखी, डोकेदुखी यासह थंडी-तापाचे रूग्ण आढळत असल्यामुळे परिसरातील दवाखाने हाऊस फुल्ल असल्याचे चित्र आहे. डासांचे वाढते प्रमाण आणि परिसरातील अस्वच्छता यामुळे रुग्णांची संख्याही वाढत असल्याने ग्रामपंचायतीने फॉगिंग मशीनही तातडीने दुरूस्त करावे, सर्वत्र धुरळणी करावी, अशी मागणी होत आहे.

  • निमसाखर परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्वे करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. या दरम्यान रूग्ण आढळून आल्यास त्याच्यावर शासकीय रूग्णालयात अथवा परिस्थितीनुसार उपचार केले जातील. याचबरोबर परिसरात योग्य ते उपाय योजना राबवले जातील.
    – प्रशांत महाजन, आरोग्य अधिकारी, आरोग्य केंद्र, निरवांगी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)