निमसाखरमध्ये गावठी दारुच्या हातभट्ट्या पेटविल्या

वालचंदनगर पोलिसांची कारवाई

निमसाखर- निमसाखर (ता. इंदापूर) परिसरातील वनविभागाच्या जागेत असलेल्या गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यावर वालचंदनगर पोलीस कारवाई केली. या कारवाईत लोखंडी ड्रममधील रसायन ओतून देत पेटवून देण्यात आल्या. वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी दारु भट्ट्यांचा शोध घेत होते. सोमवार (दि. 26) पहाटे कडाक्‍याच्या थंडीत निमसाखरजवळील वीरवस्तीत ओढ्यानजीक नीरा नदीलगत छापा टाकला. हा भाग सामाजिक वनीकरणाचा आहे. या कारवाईत दोन लोखंडी ड्रम, दोन प्लॅस्टिक ड्रम तर दोन लहान ड्रम नष्ट करण्यात आले. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही. पोलीस उपविभागीय अधिकारी शिरगावकर व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप, पोलीस हवालदार शिवाजी सातव, पोलीस नाईक गणेश काटकर, पोलीस शिपाई अक्षय गोफणे, विजय शेंडकर, महिला पोलीस शिपाई मोनीका मोहिते, आडवाल यांनी कारवाई केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)