निमसाखरचे प्रशांत रणवरे झाले पीएसआय

निमसाखर – येथील प्रशांत सुरेश रणवरे यांची नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) पदी निवड झाली. अभ्यासासाठीचे योग्य नियोजन, परिवाराचा आर्शिवाद आणि पोलीस भरती होण्यासाठी जिद्द ठेवल्यानेच यश प्राप्त केल्याचे रणवरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, माझे प्राथमिक शिक्षण वीरवस्ती शाळेत तर माध्यमिक शिक्षण वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयात झाले. वडील लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झाले असून लहानपणापासूनच देशभक्‍ती आणि वर्णीबद्दल आकर्षण होते. बारावीनंतर पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर वडिलांकडे पोलीस दलात एमपीएससीची परीक्षा देऊन जाण्याची इच्छा व्यक्‍त केली आणि त्याप्रमाणे प्रोत्साहन वडिलांनी दिले. याचबरोबर अभ्यासाबरोबर आई आणि बहिणींनी देखील वेळोवेळी आरोग्य आणि आहाराबाबत सूचना करीत असे. सुरुवातीला पीएसआय पदासाठी डिसेंबर 2016 मध्ये जाहिरात फार्म भरला व त्यानंतर या पदासाठी परीक्षा झाली. नुकतेच या परीक्षेचा निकालामध्ये प्रशांत रणवरे यांची 18 व्या रॅकने निवड झाली. पुढे एमपीएससीच्या माध्यमातून डिवायएसपी होण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)