निमगाव सावा विद्यालयात क्रांतीदिन साजरा

आळेफाटा – निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील महाविद्यालयामध्ये 9 ऑगष्ट 1942 च्या हुतात्मांना आदरांजली वाहून क्रांतीदिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य प्रल्हाद शिंदे व अनिल पडवळ यांनी दिली. क्रांतीदिनाचे औचित्य साधून घोडेगाव महाविद्यालयाचे डॉ. प्रभाकर मोकळ यांच्याहस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्‌घाटन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, संस्थेचे सचिव गणपत घोडे, प्राचार्य प्रल्हाद शिंदे, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. मोकाळ यांनी विद्यार्थ्यांना क्रांती दिनाचे व राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. प्रास्तविक प्रा. विश्वास गवारी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महेश जाधव यांनी केले. तर प्रा. शाकुराव कवडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)