निमगाव सावात 14 जोडप्याचे शुभमंगल

आळेफाटा-निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण 14 जोडपी विवाहबद्ध झाली असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आले होते. वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, उद्योजक किशोर दांगट, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समिती सदस्या अनघा घोडके, निलेश शेळके, सरपंच मंगलताई घोडे, सुवर्णा गाडगे, बाळासाहेब गाडगे, मगन गाडगे, जिजाभाऊ थोरात, संदिपान पवार, योगेश गाडगे, परशुराम लगड व विविध ठिकाणचे वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उद्योजक किशोर दांगट म्हणाले की, पुढील वर्षी या ठिकाणी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)