निमगाव वाघात मुलगी वाचवा… मुलगी शिकवा अभियान

नगर – युवक कल्याण योजने अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नगर तालुक्‍यातील निमगाव वाघा येथे मंगळवार दि.1 मे महाराष्ट्र दिनी मुलगी वाचवा… मुलगी शिकवा या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
गावातील नवनाथ विद्यालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमात न्यायाधार संस्थेच्या सचिव ऍड.निर्मला चौधरी मुलींचे न्याय, हक्क व कायदे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी मुलगी वाचवा… मुलगी शिकवाचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रम राबवून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे यांनी केले आहे. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, ऍड.भानुदास होले, ऍड.महेश शिंदे, प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
669 :heart:
0 :joy:
3 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)