निमगाव म्हाळुंगी येथे एक दिवा सैनिकांसाठी

तळेगाव ढमढेरे- देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या, प्रत्यक्ष ताबा रेषेवर सतर्क असणाऱ्या आणि देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांसाठी निमगाव म्हाळुंगी (शिरूर) येथील सैनिकांच्या घरी जाऊन नगारा वादन करून त्या ठिकाणी दिवे लावण्यात आले. याचबरोबर मिठाईही देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त हिंदू आघाडी आणि शिवराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते. निमगाव म्हाळुंगी येथे गावातील अनेक सैनिक देशाची सेवा करण्यासाठी प्रत्यक्ष ताबारेषेवर अहोरात्र काम करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून गेल्या तीन वर्षापासून “एक दिवा सैनिकांसाठी’ हा उपक्रम शिरूर तालुक्‍यातील सैनिकांच्या घरी पहाटेच्या आनंदी वातावरणात नगारा वादन करून, घरावर फुलांचे तोरण बांधून, घरासमोर रांगोळी घालून साजरा करण्यात येतो, तसेच या कुटुंबाबरोबर दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात येते. यावेळी मेजर दत्तात्रय घोलप यांची विशेष उपस्थिती लक्षणीय ठरली. या उपक्रमासाठी मेजर सैनिक संतोष कांबळे, भरत काळे, विजय शिवले, अविनाश करपे, राजू घोलप, कैलास काळे, महेंद्र चव्हाण, संभाजी चौधरी, शांताराम दौंडकर,सुधाकर कुसाळे, संजय दौंडकर या गावातील सैनिकांच्या निवासस्थानी जाऊन पहाटेच्या प्रसन्न वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला. रोहित आढाव यांनी नगारा वादन करून सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)