निमगाव म्हाळुंगीत विहिरीवरील शेतीपंपाची चोरी

शिक्रापूर- निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विंधन विहिरीमध्ये असलेल्या इलेक्‍ट्रिक विद्युतपंपाची चोरट्याने विद्युत केबलसह चोरी केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. निमगाव म्हाळुंगी येथील विलास बाठे या शेतकऱ्याचे शेतातील विद्युतपंप चोरी गेला असल्याचा प्रकार घडला असून याबाबत शारदा विलास बाठे (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाठे यांच्या शेतामध्ये त्यांनी विंधन विहीर घेतली असून त्यामध्ये त्यांनी इलेक्‍ट्रिक विद्युतपंप बसविलेला होता. बुधवारी (दि.13) सकाळी विलास बाठे हे शेतामध्ये विद्युतपंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना शेतातील विंधन विहिरीजवळ दोरी तुटलेली असल्याचे दिसले. त्यावेळी विद्युतपंप चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर शारदा बाठे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे हे करीतत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)