निमगाव म्हाळुंगीतील “त्या’ तिघांचा तडीपार रद्द

  • उपविभागीय आयुक्‍त पुणे यांचा आदेश

शिक्रापूर – निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील दादाभाऊ भाऊसाहेब भोरडे, अक्षय दादाभाऊ भोरडे, बाळासाहेब दादाभाऊ भोरडे या तिघा बापलेकांना मुंबई पोलीस कायदा कलम 56 (1) (अ) (ब) या कायद्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्याच्या तडीपारीचे आदेश नुकतेच उपविभागीय आयुक्त पुणे यांनी रद्द केले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील दादाभाऊ भाऊसाहेब भोरडे, अक्षय दादाभाऊ भोरडे, बाळासाहेब दादाभाऊ भोरडे या तिघा बापलेकांना उपविभागीय दंडाधिकारी पुणे यांनी 19 जून 2017 रोजी पुणे जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश दिले होते. तर उपविभागीय दंडाधिकारी पुणे यांच्या आदेशाने या तिघा बापलेकांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. परंतु भोरडे बापलेकांना तडीपारीचे आदेश दिल्यानंतर दादाभाऊ भाऊसाहेब भोरडे, अक्षय दादाभाऊ भोरडे, बाळासाहेब दादाभाऊ भोरडे या तिघांनी विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे तडीपारीचे प्रस्ताव रद्द करण्याबाबत कारणे दाखवत अपील केले होते. त्यांच्या अपिलाची चौकशी करत विभागीय आयुक्त पुणे यांनी मंगळवारी, 8 ऑगस्ट 2017 रोजी भोरडे यांना उपविभागीय दंडाधिकारी पुणे उपविभाग पुणे यांनी पारित केलेला हद्दपार आदेश मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 57 (1) (अ) (ब) नुसार रद्द करत असल्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील तिघांना झालेली तडीपारी रद्द करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)