निमगाव भोगी येथे ओढ्याचे खोलीकरण

अण्णापूर – जलयुक्त शिवारांतर्गत निमगाव भोगी (ता.शिरुर) येथे आयसीटीच्या मिशन सुनहरा कल कार्यक्रमानुसार तसेच अफार्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खरमाळेवस्तीजवळील सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढून खोलीकरण केले. त्यामुळे पाणीसाठा वाढून परिसरातील शेती आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या बंधाऱ्याचे काम आयसीटी कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून केले होते.

याप्रसंगी प्रकल्प अधिकारी भरत राऊत, निमगाव भोगीचे माजी सरपंच अंकुश इचके, उपसरपंच लक्ष्मण सांबारे, माजी सरपंच संजय पावसे, कांतीलाल खरमाळे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन धर्मराज रासकर, शिवाजी खरमाळे, बाबूराव रासकर, पोलीस-पाटील रायचंद व्यवहारे, भरत राऊत, सखाराम रासकर, सुनील व्यवहारे, शांताराम मोढवे, बाळू राऊत, रामदास पावसे, गहिनीनाथ रसाळ, गौतम राऊत, तुकाराम रासकर, सर्जेराव खरमाळे यांच्यासह अनेक शेतकरी आणि ग्राममस्थ उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)