निमगाव दुडे येथे पूर्व वैमनस्यातून हाणामारी

दोन्ही गटाकडून परस्परविरेधी फिर्याद : एकूण 33 जणांवर गुन्हे दाखल

शिरूर – शिरूर तालुक्‍यातील मौजे निमगाव दुडे येथे जुन्या राजकारणातील राग आणि पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील 18 आणि अनोळखी 15 असे मिळून 33 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दोन्हीं गटाकडून परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना बुधवारी (दि.28) रात्री 9 च्या सुमारास घडली.

यातील आशोक तबाजी सांळुखे (वय 45, व्यवसाय – शेती, रा. निमगाव दुडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल बाजीराव घोडे, राहुल घोडे, शिवाजी घोडे, संतोष घोडे आणि इतर ओळखीचे नसलेले 7 ते 8 जणांवर मारहाण करणे, विनयभंग करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीनुसार, गावातील अमोल घोडे हा मतदानाकरीता उभा राहीला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याच्याविरोधात मतदान केले होते. त्यांना मतदान केले नाही म्हणून त्याचा राग मनात धरून त्याच्या घरातील लोक हे फिर्यादीस नेहमी टोचून बोलत होते. बुधवारी (दि.28) गावची यात्रा असल्याने फिर्यादी मुलीच्या घरी आले होते. फिर्यादी यांचा मुलगा दिलीप यांच्या अंगावर शिवाजी घोडे आणि त्याचे सोबत आणखी दोन व्यक्‍ती गेले. तसेच त्याच्या अंगावर बुलेट घालून थांबविली. आणि खाली उतरत म्हणाले, “तुला लय माज आला होता काय?’ आणि दिलीपच्या कानफाटात मारली. तेवढ्यात अमोल घोडे हातात लोखंडी रॉड घेऊन आला. त्याच्यासोबत वरील सर्व आरोपी आले. फिर्यादी यांच्या घरात गुसले. तेव्हा राहुल घोडे याने स्वप्निल याच्या डोक्‍यात लोखंडी रॉड मारला. अमोल घोडे याने फिर्यादीच्या डोक्‍यात लोखंडी रॉड मारला. शिवाजी घोडे याने फिर्यादी यांची मुलगी शिल्पा हिचे हाताला हिसका दिला. राहुल घोडे याने चित्रा हिला शिव्या देत तिचा विनयभंग करून ढकलून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याचा तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत.

तर, याविरूध्द दाखल झालेली दुसरी फिर्यादी राजेश बाजीराव घोडे (वय 29, रा निमगाव दुडे, ता. शिरूर, जि. पुणे) याने दिली आहे. त्यानुसार स्वप्नील छगन रणसींग, दिलीप अशेक साळुंखे, रवी छगन रणसींग, अरुण अशेक साळुंखे, बाबाजी सुखदेव दुडे, कोंडीभाऊ सुखदेव दुडे, प्रवीण कोंडीभाऊ दुडे, अजित चंद्रकांत गावडे, महेंद्र नायकोडी, लहू निचीत, धांडा जाधव, प्रकाश साळुंखे, पवन साळुंखे, अजित सोनभाऊ गावडे आणि इतर पाच ते सात लोक यांच्या विरोधात जीवघेणा हल्लाकेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी यांनी जुन्या राजकारणाच्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांची बहीण शोभा हिस “तुमच्या पोराचा माज मोडला का? तुम्ही तमाशा कॅन्सल केला. नसला माज मोडला तर आम्ही येऊ का माज मोडायला’ असे म्हटल्यानंतर फिर्यादी यांची आई पुढे येऊन काय झाले?, असे विचारले. या कारणावरून बाबाजी दुडे यांनी त्यांच्या अंगावर धाऊन गेले. यावेळी त्याच्या हातात तलवार होती. त्याने तलवारीने फिर्यादी यांच्यावर धाऊन जावून “तुला मारूनच टाकतो’ असे म्हणत फिर्यादीच्या डोक्‍यात तलवार घातली. परंतु तो वार फिर्यादीचे डाव्या हातावर झेलला. तर, स्वप्नील रणसिंग यांच्या हातात कोयता आणि दिलीप यांचे हातात चाकू होता. अक्षय शिवाजी घोडे हा फिर्यादीस वाचविण्यासाठी पुढे आला असता स्वप्नीलने त्याच्या दंडावर वार केला. त्याच्या सोबत इतर सर्व आरोपी यांनी तिथे येऊन फिर्यादीच्या घराच्या दिशेने दगडफेक केली. तसेच चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)