निमगाव-कोल्हाळेतील बीएसएफच्या जवानाचा सत्कार

कैलास कोते, विजय कोते यांचा पुढाकार : मुलांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
शिर्डी – पाकिस्तानी सैनिकांशी लढताना गंभीर जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान व निमगाव-कोऱ्हाळे गावाचे सुपुत्र राजेंद्र जगताप यांचा बुधवारी ज्येष्ठ नेते कैलासबापू कोते आणी साईनिर्माण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
जगताप यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कोते बंधूंनी घेतली आहे. साई निर्माण प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात पुढील सर्व शिक्षण मोफत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोते बंधूंच्या सत्काराने जवानाचे कुटुंबीयांना गहिवरून आले. 23 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास सीमा चौकीवर जवान राजेंद्र जगताप ड्युटीवर तैनात होते. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने बॉम्ब वर्षाव केला. त्यावेळी जवान राजेंद्र जगताप व त्यांच्या साथीदार जवानांनी ज़ोरदार प्रत्युत्तर दिले.
दोन पाकिस्तानी बंकर्स, एक टॉवर व इमरान पोस्ट उद्‌ध्वस्त केली. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या रॉकेट लॉन्चरच्या हल्ल्यात जवान जगताप यांच्यासह तीन भारतीय जवान गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्यावर जम्मू येथील लष्कराच्या रूग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर जगताप हे सुट्टीसाठी गावी आले आहेत. शिर्डीनजीक असलेल्या निमगाव कोऱ्हाळे येथील जगताप यांच्या निवासस्थानी बुधवारी कैलासबापू कोते व विजय कोते यांनी भेट घेवून त्यांच्या प्रकृत्तीची चौकशी केली.
यावेळी साई निर्माण पतसंस्थेचे संचालक धनंजय साळी, संजय गोंदकर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)