निमगाव केतकीत मटका खेळाऱ्या चौघांना अटक

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील निमगाव केतकी येथे मटका खेळताना चौघांना अटक केली आहे.. शंकर भिमराव भोंग (वय 30), लक्ष्मण बलभिम भोंग (वय 28), देविदास काशीनाथ भोंग (वय 45), रणजित लक्ष्मण भोंग (वय 32, सर्व रा. निमगाव केतकी, ता इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. निमगाव केतकी गावाच्या एसटी बसस्थानकाच्या पाठीमागे मटका जुगारीचा खेळ खेळीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.त्यावरून पोलीसांनी छापा टाकला. यावेळी या चौघांकडून रोख रक्कम 1300 रुपये व जुगारीचे साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलीस हवालदार अजिज शेख करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)