निमगाव केतकीचा पैलवान संग्राम शिंदे प्रथम

निमसाखर- निमगांव केतकी येथील पैलवान संग्राम सुभाष शिंदे यांनी औंध (पुणे) स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत रोख बक्षिसासह चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. यामुळे निरवांगी (ता. इंदापूर) येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे यांचा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निरवांगी (ता. इंदापूर) येथे नुकतेच 22 गावांचा पाणी प्रश्न आणि तालुक्‍यात शेतकऱ्यांचा शेतीला जलसंपदा विभागाकडून वंचित शेतकरी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, तर नीरा भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, इंदापूर कॉंग्रेस आयचे तालुका अध्यक्ष ऍडण कृष्णाजी यादव, नीरा-भीमाचे उपाध्यक्ष विलास वाघमोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करून पैलवान संग्राम शिंदेने इंदापूरचे नाव उज्ज्वल केले आहे. शिंदे यांच्या यशाचे कौतुक करत कुस्तीबाबत लागेल ती मदत देण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)