निबंध स्पर्धेत शिवानी, चिन्मय प्रथम

राजगुरूनगर- हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत शिवानी केदारे, चिन्मय जगताप यांनी प्रथम क्रमांक पटकावले आहेत.
राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू विचार मंचाच्यावतीन निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात 5 वी ते 7 वी लहान गट व 8 वी ते 12 वी मोठा गट अशा दोन गटांत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्‍यातील अनेक शाळांमधील 250 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. मधुकर गिलबिले यांनी परीक्षण केले. यश मिळवलेल्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी हुतात्मा राजगुरू विचारमंचाचे अध्यक्ष शुभम गाडगे, आदेश टोपे, शुभम वाळुंज, संदिप पाचारणे, सुदर्शन तांबे, भास्कर शिवले आदि पदाधिकारी, पालक, शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यवान सहाणे तर कालिदास बोत्रे यांनी आभार मानले
गटानुसार विजेते
लहान गट – प्रथम : आदिती डावरे, प्रसाद पुंडे, द्वितीय : पृथ्वी गर्जे, पायल लोहोट, तृतीय : वेद गुंजाळ, ऐश्‍वर्या गोरडे, उत्तेजनार्थ : सुनील चंद्रवंशी, प्रेरणा कामथे, यश टोपे, साहिल एरंडे, सुरज गुंजाळ.
मोठा गट – प्रथम : शिवानी केदारे, चिन्मय जगताप, द्वितीय : वैष्णवी बोत्रे, साई राऊत, तृतीय : गायत्री पवळे, शिवांजली पिंगळे, उत्तेजनार्थ : काजल थिटे, मयुरी नाइकडे, वैष्णवी जव्हेरी, काजल दळवी, आदित्य पारधी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)