निबंध, लघुपट व वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण

नगर – जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग मिशनच्यावतीने स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध व लघुपट स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनित तुंबारे आदी उपस्थित होते.
18 वर्षाखालील वयोगटातील निबंध स्पर्धेत आम्रपाली आंधळे हिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. 18 वर्षावरील वयोगटाच्या निबंध स्पर्धेत जगन्नाथ आंधळे यांना प्रथम क्रमांक तर लघुपट स्पर्धेत सचिन कलमदाणे व किरण बेरड यांना विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात निखील नगरकर व अपेक्षा डोके यांना विभागून प्रथम क्रमांकाचे तर कनिष्ठ गटात रूपाली गिरवले हिला प्रथम पारितोषिक मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)