निफ्टी प्रथमच 9900 च्या पुढे

गुंतवणूकदारांकडून निवडक खरेदी चालूच

मुंबई – पाऊस चांगला पडत आहे. जीएसटी मार्गी लागला आहे. काही कंपन्यानी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. महागाई कमी होऊन व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता आहे. अमेरीका व्याजदर वाढीबाबात आक्रमक राहण्याची शक्‍यता कमी असल्यामुळे जागतीक बाजारातून सकारात्मक संकेत येत आहेत. भारतीय शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे निर्देशांकात बऱ्यापैकी वाढ होत निर्देशांक रोज नव्या विक्री पातळीवर जात आहेत. मात्र निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्यामुळे बाजारात रोज खरेदी विक्रीच्या लाटाचा अनुभव येत आहे.

बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 54 अंकानी वाढून 32074 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 29 अंकानी वाढून 9955 अंकावर बंद झाला. ही दोन्ही निर्देशांकाची विक्रमी पातळी आहे.

ब्रोकर्सनी सांगीतले की नोटाबंदीचा प्रभाव कमी झाल्यामुळे आता जाहीर होणाऱ्या ताळेबंदात नफा वाढण्याची शक्‍यता असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. पाऊस चांगला पडत असल्यामुळे या वर्षी कृषी क्षेत्राकडून अर्थव्यवस्थेला चांगलाच आधार मिळणार आहे. जीएसटीमुळे आणि पावसामुळे ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणऱ्या कंपन्यानी शेअर बाजारात चांगली कामगीरी केली आहे.

दरम्यान विश्‍लेषकांचे गुंवणूकदारांना सावध राण्याचे सांगणे चालूच आहे. मात्र काही कंपन्या नजीकच्या काळात चांगली कामगीरी करण्याची शक्‍यता असल्यामुळे गुंतवणूकदाराकडून निवडक खरेदी चालूच असल्यामुळे निर्देशांक मागे वळून बघायला सध्या तरी तयार नाहीत.

विप्रो कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या कंपनीने इतर कंपन्याप्रमाणे शेअरची फेरखरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याला संचालक मंडळाची मंजूरी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आज या कंपन्याच्या शेअरचे भाव 3.12 टक्‍क्‍यांनी वाढले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)