नवी दिल्ली : ऐन पर्यटनासाठी पुरक असणाऱ्या दिवसांमध्येच केरळमध्ये निपाह व्हायरस झपाट्याने परसरत असल्यामुळे याचा परिणाम थेट इथल्या पर्यटन क्षेत्रावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण, मुळात इथल्या स्थानिाकांनी मात्र व्हायरसविषयीच्या चर्चा काही चुकीच्या असून त्याविषयीची चुकीची माहिती सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून दिली जात असल्याचे मत मांडले आहे.

केरळमधील कोझिकोडे इथे या व्हायरसची पहिली लागण झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यानंतर त्यामुळे जवळपास १२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या व्हायरसवर कोणताही उपचार उपलब्ध नसल्यामुळे सध्या कोझिकोडे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. पण, या सर्व चर्चा आणि वातावरणाचा फटका केरळच्या पर्यटनावर होत असून, ऐन मोसमातच पर्यटन व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)