निपटारा तातडीने होण्यासाठी…(भाग-२)

निपटारा तातडीने होण्यासाठी…(भाग-१)

संकुचित विचारसरणी जबाबदार
आजच्या आधुनिक वातावरणात देखील महिलांप्रती अजूनही समाज संकुचित विचार बाळगून आहे. महिलांसाठी आयटम, माल, मस्त यांसारख्या शब्दांचा वापर केला जातो. महिलांकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. लहान शहरात तर मुलींची सुरक्षितता नेहमी धोक्‍यात राहिलेली आहे. त्यांना गावातील, नाक्‍यावरच्या किंवा चौकात उभ्या असलेल्या टारगट मुलांच्या असभ्य वर्तनाला बळी पडावे लागते. यातून मुलींच्या विकासाला बाधा निर्माण होते. समाजातील अशा प्रकारचा विचार आपल्याला घटनांवरून दिसून येतो तर त्याची झलक अश्‍लील चित्रपट, साहित्यात दिसून येते. हिंदी चित्रपटातील गीत ऐकले तर महिलांच्या स्वाभिमानाला, आत्मसन्माला ठेच लागल्याशिवाय राहात नाही. चित्रपटात महिलांबाबत नेहमीच विकृत चित्रण दाखवले जाते. महिलांशी किंवा मुलींशी छेडछाड करणे किंवा त्रास देणे चुकीचे नाही, असे चित्र चित्रपटातून रंगवले जाते. त्यातही आजच्या काळात पॉर्न साईटस्‌ देखील मोठी समस्या बनली आहे. या साईट युवक आणि अल्पवयीन मुलांच्या मनावर विपरित परिणाम करत आहेत. जोपर्यंत महिलांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही आणि आदरयुक्त नजरेने पाहिले जात नाही, तोपर्यंत समाजातील संकुचित विचार बदलणार नाही. ही विचारसरणी अशीच जर कायम राहिली तर अत्याचाराच्या घटनांना लगाम घालणे मुश्‍कील आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यायदानाची प्रक्रिया
देशातील वाढत्या अत्याचाराला रोखण्यासाठी तक्रारीवर तातडीने निपटारा होणे गरजेचे आहे. कोणत्याही महिलेसाठी अत्याचार ही घटना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या धक्का देणारी असते. त्यानंतरही स्वत:ला सावरून पीडितेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यास त्यात तातडीने निवाडा व्हावा, अशी तिची अपेक्षा असते. मात्र, खटल्यात विलंब झाला तर साक्षीदार बदलले जातात. बराच काळ खटला रेंगाळल्यास पीडितेच्या स्थितीत बदल होतो. तारीख पे तारीख ही म्हण सत्यात उतरल्यास कालांतराने पीडित कोर्टाची पायरी चढण्यास तयार होत नाही. अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्यांचा आवाजही क्षीण होतो. तर दुसरीकडे अत्याचार करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढते. अत्याचार केला तरी शिक्षा होत नाही किंवा उशीर होतो, या मानसिकेतेत आरोपी वावरतात आणि अप्रिय घटना घडवून आणतात. म्हणून कदाचित भविष्यात अत्याचारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, यासंदर्भातील खटले तातडीने निकाली लावण्यासाठी वेगळे न्यायालय स्थापन करावे लागेल आणि निकालासाठी देखील डेडलाईन निश्‍चित करण्याची तयारी करावी लागेल.

– अपर्णा देवकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)