नितीश यांच्या हालचालींमुळे एनडीएमध्ये टेन्शन

File Photo

पासवान यांनी साधला संपर्क
नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्या राजकीयदृष्ट्या चक्रावून टाकणाऱ्या हालचालींमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) टेन्शन निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यातून आज एनडीएचा घटक असणाऱ्या लोजपचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी नितीश यांच्याशी संपर्क साधला.

लोकसभा निवडणुकीला आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. अशातच जेडीयू आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये बिहारमधील जागावाटपावरून तणातणी सुरू झाल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये मोठ्या भावाची भूमिका आम्ही निभावू. बिहारमध्ये नितीश हेच एनडीएचा चेहरा असतील, अशी आग्रही भूमिका घेण्यास जेडीयूने सुरूवात केली आहे. जेडीयूची ही भूमिका भाजप थेट खोडत नसला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशभरात एनडीएचा चेहरा असतील, असे आडवळणाने भाजपकडून सूचित केले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बिहार एनडीएमध्ये भाजप, जेडीयूबरोबरच लोजप आणि आरएलएसपी या एकूण चार पक्षांचा समावेश आहे. आरएलएसपीचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी जेडीयूच्या मोठ्या भावाच्या भूमिकेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून बिहार एनडीएमध्ये आतापासूनच बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशातच नितीश यांनी सध्या आजारी असणारे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

जेडीयूच्या पवित्र्यामुळे बिहार एनडीएमधील टेन्शन वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर पासवान यांनी नितीश यांच्या दूरध्वनीवरून संपर्क साधला. बिहारमधील एनडीए शाबूत राहील. आगामी लोकसभा निवडणूक एनडीए एकजुटीने लढेल, असा विश्‍वास पासवान यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीकडे एनडीएच्या घटक पक्षांचे लक्ष लागले आहे. ते जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात बिहारचा दौरा करणार आहेत. त्यावेळी ते एनडीएच्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)