नितीश कुमार आणि अमित शहा यांच्यात छोटी भेट

पाटणा – नितीश कुमार हे भाजपपासून दूर जातील अशी आशा करणे विरोधकांनी सोडून द्यावे. ते आमच्याबरोबरच राहणार आहेत. बिहारमध्ये भाजप आणि संयुक्‍त जनता दल मिळून लोकसभेच्या 40 जागा जिंकतील, असा विश्‍वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्‍त केला.

शहा यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. या छोट्याश्‍या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभेच्या निवडणूकीच्या दृष्टीने राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते आहे.

रांचीवरून अमित शहा सकाळीच पाटण्याला पोहोचले. पत्रकारांच्या प्रश्‍नांना बगल देऊन ते थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीला रवाना झाले. यावेळी भाजपचे उपमुख्यमंत्री सुशिल मोदी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी भुपेंद्र यादव आदी उपस्थित होते.

अमित शहा आणि नितीश कुमार यांनी मिळून एकत्र अल्पोपहारही केल्याने राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा थांबण्याची शक्‍यता आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजद आणि कॉंग्रेसची साथ सोडून भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर प्रथमच ते बिहारच्या भेटीवर आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)