भाजपची साथ सोडत नितीश कुमारांचाही स्वबळाचा नारा? 

पाटणा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सहकारी पक्षांमध्ये जागा वाटपावरून मतभेद होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने सहकारी पक्षांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा चालू केली आहे. भाजपने बिहारमध्ये ४०-२० चा फॉर्म्युला वापरत असल्याने अनेक घटक पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशामध्ये जनता दल युनायटेड स्वबळाचा नारा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मागच्याच आठवड्यात झालेल्या बैठकीत भाजपने जागा वाटपासंदर्भात सहकारी पक्षांची सहमती असल्याचे म्हंटले होते. यामध्ये ४० मधील २० जागांवर भाजपने दावा केला आहे तर अन्य पक्षांमध्ये जेडीयू १२ जागा, रामविलास पासवान यांच्या एलजेपी पक्षाला ६ जागा आणि उपेंद्र कुशवाह आरएलएसपीला  दोन जागा देण्यात आल्या आहेत. यावरून सहकारी पक्षमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. पंरतु, जेडीयू नेते के.सी. त्यागी यांनी ही आकडेवारी फेटाळून लावली असून ते म्हणाले, अद्यापही सर्व पक्षांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा चालू आहे. कोणतीही आकडेवारी अंतिम झालेली नाही. अशामध्ये हे आकडे कोण आणि कसे पसरवत आहे माहित नाही. मात्र जर या आकड्यांमध्ये तथ्य असेल तर आम्हाला ते अमान्य असतील, असेही त्यांनी सांगितले.

भाजपाला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्याने तसेच कर्नाटकातही सत्ता स्थापनेत आलेले अपयश पाहता जेडीयू सर्व जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू शकते.

जेडीयूमधील एका वरिष्ठ नेत्याने म्हंटले की, बिहारमधील एकूण ४० जागांमधील १६ जागा जेडीयू आपल्याकडे ठेवू इच्छिते आणि १६ भाजपाला देऊ शकते. व अन्य आठ जागांवर एनडीएतील घटक पक्षांना देण्यात येईल. जर भाजपला हे मेनी नसेल तर जेडीयू स्वबळावर निवडणूक लढवेल असेही जेडीयूमधील एका नेत्याने म्हंटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)