नितीन राउत यांना समाजरत्न पुरस्कार

जेजुरी- राष्ट्रीय नाभिक महासंघ आयोजित हुतात्मा वीर भाई कोतवाल राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार सोहळ्यात शैक्षणिक पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जेजुरी येथील नितीन राऊत यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय नाभिक महासंघ सलग्न महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या वतीने राज्यातील नाभिक समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक, चित्रपट, नाट्य, कला, क्रीडा साहित्य, संगीत आदी क्षेत्रातील प्रतिभावंत ज्ञानी आणि गुणीजनांचा गौरव कार्यकर्तृत्वाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी (दि. 24) येथे आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष भगवानराव बिडवे, खासदार अमर साबळे, तेलंगणाचे जगदीश नाई, मध्यप्रदेश केश कला बोर्डाचे अध्यक्ष नंदकिशोर वर्मा, मंत्री मनाला, राज्य संघटनेचे पदाधिकारी दत्तात्रय अनारसे, साहित्यिक शशिकांत चव्हाण, प्रकाश सोनवणे, सिनेकलावंत गणेश यादव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भामे, तसेच राज्यभरातून समाजबांधव उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष अंकुश खडके, पुणे शहरचे अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, पदाधिकारी सुभाष जाधव, अप्पासाहेब पंडित, राजेश पाथरकर, पुंडलिक सैंदाणे, बेबीताई कऱ्हेकर, मोहन सूर्यवंशी, दत्तात्रय मोरे, महेश सांगळे, नीलेश पांडे, प्रदीप रायकर, राजेश गायकवाड, दत्तात्रय जाधव, अंकुश बिडवे, माधुरी सांगळे, सुशील राऊत, मल्हार राऊत, व्यंकटेश कुऱ्हाडे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)