नितीन पटेल यांची नाराजी दूर; मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार

अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजवणारे व गुजरात मधील भाजपचे पाटीदार समाजाचे नेते, नितीन पटेल महत्वाची खाती न मिळाल्याने पक्षावर नाराज असून, भाजपने त्यांच्यावर सोपवलेल्या खात्यांच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. हा काही खात्यांचा प्रश्न नसून तो माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न असल्याचं त्यांनी म्हंटले होत. तसेच पक्षनेतृत्व याबाबत माझ्या भावना समजून घेईल अशी अपेक्षाही  त्यांनी व्यक्त केली होती. मात्र आता पक्षनेतृत्वाने त्यांच्या भावना समजून घेतल्याने त्यांची नाराजी दूर झाली आहे. याबाबत खुद्द नितीन पटेल यांनीच खुलासा केला आहे.

पटेल म्हणाले की,आता मी गुजरात सरकारमध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मला तोलामोलाचे खाते तुम्हाला दिले जाईल तुमच्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले  असून, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही असेही पटेल यांनी स्पष्ट केले. आज सकाळी ७.३० वाजता मला अमित शहांचा फोन आला. तुमची नाराजी मी समजू शकतो. मात्र आम्ही तुम्हाला असे खाते देऊ ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. असे आश्वासन मला शहांनी दिले त्यामुळे नाराज होण्याचा प्रश्न उरलाच नाही.  लवकरच आपल्याला देण्यात आलेल्या मंत्री पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचं त्यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)