नितीन गडकरी, क्षीरसागर यांच्या भेटीचा उद्देश साध्य

बीड : शहरातून जाणारा रस्ता देखील चौपदरीकरण करण्यात यावा यासाठी मध्यंतरी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. जिल्हाभर या भेटींची चर्चा विविध अंगाने झाली होती. मात्र, मागणीनुसार कोल्हारवाडी ते जिरेवाडी या १२ किमी रस्त्यासाठी १०० कोटी रूपये मंजूर झाले असून, आज याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. बीड शहरातून जाणारा बार्शी नाका ते जालना रोड या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे यासाठी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती.

त्यानुसार या प्रस्तावाला केंद्रीय मंत्र्यांनी तत्वतः मंजूरी दिली होती व या रस्त्याबाबत सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सुचना आपल्या अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार आज सॊमवारी एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर, महेश पाटील, रविंद्र चौरे तसेच दिल्ली येथील सर्वेक्षण करणारे अधिकारी सितेश कुमार, बाबुला पोलाई यांनी रस्त्याचे सर्व्हेक्षण केले आहे. याच बरोबर चौसाळा येथील गावातून जाणारा ५ किमीचा रस्ता चौपदरीकरण करण्यात यावा यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, सदरील रस्त्यालगतचे जे अप्रोच रोड आहे त्याचाही समावेश यामध्ये करण्यात यावा अशी सुचना आ.जयदत्त क्षीरसागर यांनी प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांना त्याचवेळी केली होती.

त्यानुसार अप्रोच रोडचे सर्व्हेक्षण करून डीपीआर सादर करण्याच्या सुचना संबंधीत अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. या दोनही रस्त्याचे काम मार्गी लागल्यामुळे  बीड शहराचे नाक असलेला हा रस्ता चौपदरी होत असल्यामुळे नागरीकांंमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)