नितीन आगे खून प्रकरणातील फितुरांची 6 फेब्रवारीला सुनावणी

नगर – जिल्ह्यासह संपूर्ण राज्याभरात गाजलेल्या जामखेड तालुक्‍यातील नितीन आगे खून खटल्यातील फितूर साक्षीदारांची सुनावणी वकीलांच्या संपामुळे मंगळवार दि.6 फेब्रुवारी रोजी येथील जिल्हा न्यायालयात होणार असल्याची माहिती सरकारी वकील रामदास गवळी यांनी दिली आहे.

जामखेड तालुक्‍यातील खर्डा येथील नितीन राजू आगे या खून प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मग नितीनला कोणी मारले? असा प्रश्‍न समाजातील विविध घटकांमध्ये तसेच आंबेडकरी चळवळीतील संघटनांमध्ये जोर धरू लागला. याबाबत राज्यभर आंदोलने झाल्यानंतर या खटल्याची फेर सुनावणी व्हावी, अशी मागणी राज्यसरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार या बहुचर्चित खून खटल्यातील फितूर साक्षीदारांची सुनावणी 6 फेब्रवारीला होणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)