निढळच्या शितल घाडगेंची क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी

वडूज – निढळ, ता. खटाव येथील सौ. शितल महेश घाडगे यांनी ठाणे येथील वसंत विहार संकुलात एकता प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्या ठाणे येथील ढोकाई नगरमधील “न्यु म्हाडा चकदे गर्ल’ संघातून खेळतात.

या स्पर्धेत त्यांनी चार सामने खेळत 62च्या सरासरीने धावसंख्या उभारली. क्षेत्ररक्षण करताना विकेट किपरची जबाबदारी संभाळताना चार बळी तसेच दोन झेल घेतले. स्पर्धेत त्यांच्या संघाने प्रथम विजेतेपद पटकावले. तर सौ. घाडगे यांना मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान मिळाला. त्यांना नगरसेविका जयश्री डेव्हीड, उषा संजय भोईर यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले. त्या दादोजी कोंडदेव व हिरा नंदानी क्‍लबचे बॅडमिंटन कोच महेश घाडगे यांच्या पत्नी, माजी सैनिक आनंदराव विश्‍वनाथ घाडगे यांच्या सुनबाई तसेच वर्धनगड येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव वरेकर यांच्या सुकन्या आहेत. या यशाबद्दल सौ. घाडगे यांचे खटाव तालुक्‍यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)