निघोटवाडीच्या राजाची मंचरमध्ये भव्य मिरवणूक

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील निघोटवाडी येथील जय हनुमान गणेश मित्र मंडळाच्या गणेशमुर्तीची भव्य मिरवणुक मंचर शहरात काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या सुमधूर आवाजात निघालेल्या मिरवणुकीत ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

निघोटवाडी येथील मंडळाचे 35वे वर्ष आहे. 13 फूट 8 इंच उंचीची गणेश मूर्तीची मिरवणूक पुणे-नाशिक हमरस्त्यावरून मंचर शहरातील लक्ष्मी रस्त्यावरून शिवाजी चौक मार्गे निघोटवाडी येथे पोहचली. यावेळी बॅन्ड पथकाने सुमधूर आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध केले. यावेळी सरपंच नवनाथ निघोट, बाबाजी टेमगिरे यांनी गणेशमुर्तीला पुष्पहार घालून पूजा केली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष किसन बाबुराव निघोट यांनी दिली. लालबाग येथून गणेशमूर्ती आणण्यासाठी सात तास लागले. शुक्रवारी (दि. 14) हनुमान प्रासादिक भजन मंडळ निघोटवाडी यांचे संगीत भजन, शनिवारी (दि. 15) हभप विनायकमहाराज निघोट यांचे गणेश प्रवचन, दि. 16 रोजी लहान मुले व महिलांसाठी विविध कलागुण स्पर्धा, 17 रोजी किरण महाजन यांचा गीतबहार ऑर्केस्ट्रा, 18 रोजी खेळ पैठणीचा, 19 रोजी जय मल्हार संगीत भजन मंडळ श्रीक्षेत्र धामणखेल, दि. 20 भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा, सर्व स्पर्धेचे बक्षिस वितरण शिवव्याख्याते हभप संतोषमहाराज बढेकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)