निघोजे शाळा समितीचे बैठक खेळीमेळीत

चिबंळी- निघोजे (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व व्यवस्थापन समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपाययोजना या बैठकीत सुचविण्यात आल्या असून त्या तत्काळ अंमलात आणल्या जातील असे ठरविण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष तानाजी येळवंडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व व्यवस्थापन समितीची बैठक तानाजी येळवंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.. याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, शाळा समितीचे उपाध्यक्षा मिना पाडेकर व सर्व सदस्य तसेच सर्व संचालक उपस्थित होते. दरम्यान, बैठकीत मागील सभेचे प्रोसिंडीग वाचून जमा खर्चास मंजुरी देणे, शालेय भौतिक सुविधा, सास्कृंतिक हॉल तयार करणे, पोषण आहार, जेवणाची डीश प्रत्येक विद्यार्थ्यांना देणे, अंशकालीन नेमणूक करणे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. तर ज्ञानेश्‍वर नाणेकरवाडी यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या संचालकपदी निवड करण्यात आल्यानंतर सरपंच रमेश गायकवाड व उपसरपंच आशिष येळवंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून वर्ग शिक्षिक सुनिल कातोरे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)