निघोजे-मोई रस्त्याने चालणेही अवघड

चिंबळी- कुरुळी परिसरातील निघोजे-मोई व निघोजे रस्त्याची चाळण झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या साईट पट्ट्या खचल्या आहेत. या रस्त्यावर जर दोन्ही बाजूने वाहने आल्यास वाहतूककोंडी होवून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
निघोजे-मोई या चार कि.मी अतंर असलेल्या रस्त्यावर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून दोन्ही बाजूने साईट पट्ट्या उखडल्या आहेत. मोई ते कुरूळी (मुऱ्हेवस्ती) येथून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चिंबळीफाट्यापर्यंत रस्त्सावर ही मोठ्याप्रमाणात खड्डे पडून दोन्ही बाजूने साईट पट्ट्या खचल्या आहे, तर मुऱ्हेवस्ती येथून डोंगरेवस्ती मोई रस्त्यावर असलेल्या पुलांची दुर्दशा झाली आहे, तर साकव पुलाच्या दोन्ही बाजूने लोखंडी ऍगलचे संरक्षण कडठे तुटले आहे, वाहनचालकांसह पादचाऱ्यांना चालणही कठीण होत आहे.
निघोजे ते मोई या रस्त्यावरून पिंपरी-चिचंवड हद्दीत असलेल्या चिखली गावाकडे जडमालवाहनांची सतत वर्दळ असते तसेच मोई येथे मोठ्या प्रमाणात क्रशर असल्याने येथे अवजड मालवाहू वाहनांची वर्दळ सुरूच असते, त्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेत आणखीनच भर पडत आहे.
कुरुळी-चिंबळी-मोई-निघोजे-केळगाव-माजगांव परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून साईट पट्ट्या उखडल्याने मोटारसायकल चालवणे व पायी चालणेही कठीण झाले आहे. तसेच चिंबळी ते आळंदी रस्त्यावर चार ते पाच ठिकाणी साकव पुलांची दुर्दशा झाली आहे, तर केळगाव येथील साकव पुलावर खड्डे पडले असतल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)