चिंबळी – निघोजे ते कडवस्ती (कुरूळी, ता. खेड) रस्त्यावर सतत मालवाहतूक वाहनांची सतत वर्दळ असते. त्यातच या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ अशी म्हणण्याची वेळ आली होती. तर याबाबत “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने या वृत्ताची दखल घेत या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केल्याने नागरिकांनी “प्रभात’चे आभार मानले आहेत. निघोजे ते कडवस्ती या परिसरात गेल्या 10 वर्षांपासून औद्योगिक क्षेत्र आल्याने या भागात छोट्या मोठ्या कंपन्या व गोदामे उभी राहल्याने माल ने-आण करण्यासाठी जड वाहनांची सतत वर्दळ सुरू झाल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे रस्त्यावरुन चालणेही चिकरी झाले होते. हीच नागरिकांची अडचण ओळखून “प्रभात’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वत्ताची दखल घेत या रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, नुसतीच डागडुजी केली तर या रस्त्यावर पुन्हा पावसाळ्यात खड्डे पडून पावसाचे पाणी साचून ररस्त्याची आणखी वाट लागणार असल्याने रस्त्याची डागडुजी न करता दर्जेदार काम करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)