निघोजेत साकारणार पहिली पर्यावरणपूरक शाळा

सरपंच येळवंडे यांची माहिती ः साहेबराव फडके यांनी दिली मोफत जागा
चिंबळी  -पुणे जिल्ह्यात खेड तालुक्‍यात कुरूळी जिल्हा परिषद व पंचायत गणातील औद्योगिक क्षेत्रात जमीनींना सोन्याचे भाव मिळत असतानाही निघोजे (फडकेवस्ती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकासाठी मुलांच्या शिक्षणासाठी मुलभूत सोईसुविधा उपलब्ध होण्यासाठी काळूबाई ट्रस्टचे अध्यक्ष व निघोजे गावचे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव फडके यांनी मोफत जागा देऊन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करून ठेवला असल्याने पुढील काळात तरूण पिढीतील युवकांनी याचा आदर्श घेऊन लोकहिताच्या कामासाठी आपले योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन निघोजे गावच्या सरपंच सुनिता येळवंडे यांनी केले.
निघोजे (फडकेवस्ती) येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड तालुक्‍यातील पुणे जिल्ह्यातील ही पहिली पर्यावरणपूरक साकारणार असल्याने निघोजे (ता. खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते व व्ही. डब्ल्यू तसेच काळूबाई ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव फडके यांनी निघोजे (फडकेवस्ती) येथील शाळेच्या बांधकासाठी पाच गुंठे जागा ग्रामपंचायतीला मोफत दिली. शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन सरपंच, उपसरपंच सर्व सदस्यांच्या हस्ते व काळूबाई ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव फडके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सरपंच सुनिता येळवंडे यांनी सांगितले. याप्रसंगी उपसरपंच राहुल फडके, माजी आदर्श सरपंच कांचन शिंदे, माजी उपसरपंच दयानंद येळवंडे, संतोष येळवंडे, व्ही. डब्ल्यूचे व्यवस्थापक संजय खरे, पंकज गुप्ता, गौरव आगरवाल, उमेश बेलकर, आप्पासाहेब फडके, भुवनेश्वरी कैलास येळवंडे, नवनाथ येळवंडे, ग्रामसेवक विजय भंडारे व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. निघोजे (फडकेवस्ती)(ता. खेड) येथील पुणे जिल्हा परिषदेमार्फत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून या शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाल्यामुळे व जागा कमी असल्याने बांधकाम करणे सोईस्कर होत नव्हते. त्यामुळे काळूबाई ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव फडके यांनी हे लक्षात घेताच मुलांना शैक्षणिक सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतः आपली पाच गुंठे जागा मोफत शाळेला देऊन एक सामाजिक उपक्रम करून परिसरातील डब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सुसज्ज असा वर्गखोल्या बांधून मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय व मुख्याध्यापक कार्यालय सौरदिवे इत्यादी सोयीसुविधा करण्यासाठी दुमजली इमारत बांधण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व मुला-मुलींना प्रथमच शहरी भागातील इंग्रजी शाळांपेक्षा चांगल्या प्रकारची सोयी-सुविधांयुक्त शाळा बांधण्यात येणार असल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढणार आहे, अशी भावना मनुष्य विकास अधिकारी भुवनेश्वर यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)