निघोजेत येळवंडे, पाडेकर यांचा सत्कार

चिंबळी- निघोजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तानाजी येळवंडे तर उपाध्यक्षपदी मिना पाडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच आशिष येळवंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत सदस्य जितेंद्र आल्हाट, सागर येळवंडे, निलेश पवार, रामदास येळवंडे, चंद्रकांत बेंडाले, अलका पाडेकर, नम्रता येळवंडे, सुजाता फडके, रूपाली येळवंडे, वृषाली पानसरे, रिटाबाई सोनवणे, सुनिता शिंदे, ग्रामविकास अधिकारी व्ही. एन. गाडविलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)