निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे

निगडी : मॉडर्न हायस्कूलमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना डॉ. अविनाश भोंडवे यांनी लैंगिक शिक्षणाचे धडे दिले.

पिंपरी, (प्रतिनिधी) – रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना डॉ. अविनाश भोंडवे यांनी लैंगिक शिक्षणाचे धडे दिले.

यावेळी रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, सचिव नीता अरोरा, प्रकल्प अधिकारी राम भोसले, मॉडर्न हायस्कूल (माध्यमिक)चे मुख्याध्यापक गोकुळ कांबळे, डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. डॉ. भोंडवे म्हणाले की, वयाच्या 16 ते 30 या 14 वर्षांच्या काळात शारीरिक आणि भावनिक बदल होतात. तसेच या वयात भरकटण्याची देखील दाट शक्‍यता असते. त्यामुळे या वयात विद्यार्थ्यांनी फार जपून राहायला हवे. इतरत्र लक्ष देण्यापेक्षा योग्य मार्गदर्शनातून चांगले शिक्षण घेतले, तर चांगली नोकरी लागेल. याचा फायदा पुढच्या संपूर्ण आयुष्यासाठी होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने संयमाने बाळगला पाहिजे. या वयात अनेक गोष्टी आकर्षित त्यापासून स्वतःला सावरणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी कसरत असते. ती कसरत प्रत्येक विद्यार्थ्याने केली पाहिजे.

शासन स्तरावर लैंगिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले असले तरी आजही ते लाजेखातर पाहिजे तितक्‍या प्रकटपणे दिले जात नाही. ठराविक वयात विद्यार्थ्यांच्या शारीरिक बदलांबरोबर होणारे भावनिक बदल याबाबत योग्य वेळी मार्गदर्शन होणे आवश्‍यक आहे. माणसाची वाढ होताना होणारे शारीरिक बदल याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असणारे समज आणि गैरसमज यावर डॉ. अविनाश भोंडवे यांनी प्रकाश टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)