निगडी येथील बस स्थानकावर प्रवासी वाऱ्यावर

निगडी – शहरातील मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखाली पीएमपीचा बसथांबा आहे. सद्यस्थितीत हा बसथांबा गैरसोईचे आगार बनला आहे. याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या बस थांब्यावरून हिंजवडी आणि मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात बस जातात. परंतु, येथे असणारे बस शेड अपुरे आहे. या ठिकाणी पाच प्रवासीच बसू शकतात. त्यामुळे उभे राहून प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. या ठिकाणी रिक्षा चालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे बस रस्त्यात उभ्या कराव्या लागत आहे. प्रवाशांना धोकादायकपणे उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते.

-Ads-

बराच वेळा चालक जादा वेगाने गाडी पळवतात. त्यामुळे किरकोळ अपघात होतात. याबाबत वारंवार प्रवाशांनी तक्रार करूनही प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी लावलेला फलकही प्रवाशांना दिसत नाही. चौकशी खिडकीपाशी गेल्यावर व्यवस्थित उत्तरे दिली जात नसल्याबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)