निगडी, भोसरीत “पॉस्को’चे गुन्हे

पिंपरी – निगडी व भोसरी येथे बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार एका शिक्षकावर व अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.

निवृत्ती देवराम काळभोर (वय-51 रा. चिंचवड) असे शिक्षकाचे नाव असून 15 वर्षीय विद्यार्थिनीने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. काळभोर याने या विद्यार्थिनीला एकांतात भेटण्याची मागणी केली. यापूर्वीही त्याने तिच्याशी गैरव्यवहार करत लग्नाची मागणी केली होती. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने निगडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी काळभोर याला अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत एका अल्पवयीन मुलाने दहावीतील विद्यार्थिनीचा शाळेपर्यंत पाठलाग करत तो थेट तिच्या शाळेत गेला. त्याला तेथील शिक्षिकेने हटकले असता त्याने शिक्षिकेलाच शिविगाळ केली. हा मुलगा पीडितेला नोव्हेंबर 2017 पासून त्रास देत होता. तो शाळेत आल्याने शिक्षकेमुळे हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)