निगडी-भेकराईनगर मार्गावर ई-बसची “ट्रायल’

पुणे – दाखल झालेल्या इलेक्‍ट्रिक बसची निगडी-भेकराईनगर मार्गावर “ट्रायल’ घेण्यात आली. ओलेक्‍ट्रा (बीवायडी) कंपनीची 12 मीटर लांबीची बीआरटी मार्गावर धावणारी ही बस आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू केलेली “ट्रायल’ रात्री उशिरापर्यंत सुुरू होती.

पीएमपीच्या ताफ्यात पाचशे वातानुकूलित ई-बस भाडेकराराने घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यानूसार सुरूवातीच्या टप्प्यात 150 ई-बसेस खरेदी करण्याचे नियोजन असून यासाठीच्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. यात 9 मीटर लांबीच्या “नॉन बीआरटी’ ई-बससेची महिनाभरापूर्वीच चाचणी घेण्यात आली आहे. तर, 12 मीटर लांबीची बस बीआरटी मार्गावर धावणारी आहे.

-Ads-

“सीआयआरटी’, पीएमपीतील अधिकारी
चाचणीदरम्यान “सीआयआरटी’ आणि पीएमपीतील अधिकाऱ्यांकडून बसेसचा परफॉर्मन्स तपासला जात आहे. पुढील काही दिवस हे काम सुरू राहणार असून यानंतर याचा अहवाल येईल. दरम्यान, या बसेसच्या चार्जिंगची सोय पीएमपीच्या मुख्य कार्यालयातच करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)