निगडी-दापोडी बीआरटीला न्यायालयाचा “स्टार्ट अप’

दहा दिवसांत सेवा सुरु : महापालिका प्रशासनाचा दावा

पिंपरी – सात वर्षांपासून रखडलेल्या निगडी ते दोपोडी बीआरटीएस मार्गाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला असून, येत्या आठ ते दहा दिवसांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करणार आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यालयात सुरक्षितता व उपाय योजनेचा मुद्दा उपस्थित करीत याचिका दाखल केली होती.त्यामुळे 2010 साली मंजूर झालेला हा प्रकल्प रखडला होता. मात्र, दि. 9 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने बीआरटी बस सुविधा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.

बीआरटी प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेकडून कर्ज घेतले होते. तसेच, रस्ते, सुरक्षा उपाय योजना, बस थांबा असा 27 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे काम रखडले होते. हा मार्ग 12.50 किमी लांबीचा व 61 मीटर रुंदीचा हा मार्ग असणार आहे. या मार्गावर एकूण 36 बसथांबे आहेत. या मार्गावरुन पुणे स्टेशन, मनपा, कोथरुड डेपो, अप्पर, इंदिरानगर, येरवडा, वाघोली, कात्रज, हडपसर, वारजे, माळवाडी, खडकी अशा 13 मार्गांवरील बसेस या “बीएरटीएस’च्या मार्गावरुन धावणार आहेत. दरम्यान, “बीआरटी’मुळे रस्ता अरुंद झाला असून, अपघातांचा धोका निर्माण झाल्याचा आरोप होऊ लागला.

पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून हिम्मतराव जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी होऊन याचिकाकर्ते जाधव यांच्या समक्ष या बीआरटी मार्गावर चाचणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याप्रमाणे एप्रिल व जुलै महिन्यात दोन वेळा बस चाचणी घेण्यात आली. “बीआरटी’बाबत आयआयटी पवई संस्थेने सूचवलेल्या सुरक्षा उपयायांचा अवलंब केला आहे. त्याप्रमाणे सुरक्षा उपाययोजनांचा अहवाल महापालिकेने न्यायालयाला सादर केला होता. त्यानुसार गुरुवारी (दि.9) न्यायालयाने या याचिकेवर निर्णय दिला. या “बीआरटी’ मार्गावर बससेवा सुरू करण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

काय आहेत न्यायालयाच्या सूचना?
निगडी-दापोडी मार्गावर “बीआरटी’ बससेवा सुरू करून आगामी दोन महिन्यात या बससेवेचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सुरक्षारक्षक, वॉर्डन नेमणे, बसथांबे व बसेसमध्ये आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करणे ही कामे दहा दिवसांत पूर्ण केली जातील. त्यानंतर महापालिका पदाधिकाऱ्यांना दाखवून हा “बीआरटी’ मार्ग सुरू केला जाणार आहे. सांगवी-किवळे व नाशिक फाटा-वाकड “बीआरटी’ मार्गावर कुठलाही अपघात झाला नसून, निगडी-दापोडी मार्ग सुरू करतानाही सर्व उपाय अंवलंबवण्यात येणार आहेत.

“बीआरटी’ खरचं सुरक्षित?
दरम्यान, पुणे मेट्रोचे काम सुरु झाल्याने निगडी-दापोडी “बीआरटी’ मार्गावर काही ठिकाणी खोदकाम केले आहे. काही ठिकाणी मार्गाला तडेही गलेले आहेत. “बीआरटी’ पेक्षा मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. पुढच्या वर्षात मेट्रोचे पिंपरी-चिंचवड परिसरातील काम पूर्ण करुन चाचणी घेणार असल्याचा दावाही प्रशासन करीत आहे. त्यामुळे न्यायालयाने जरी “बीआरटी’ला हिरवा कंदिल दाखवला असवला, तरी आठ दिवसात त्यांचे काम पूर्ण होईल का? असा प्रश्‍न आहे. शिवाय आता शहराला दापोडी-निगडी बीारटीएस मार्गिकेची खरच गरज उरली आहे का? तसेच, महामार्गाच्या मध्यभागी असलेला हा “बीआरटी’ मार्ग नागरिकांसाठी सुरक्षित आहे का? असे प्रश्‍न अनुत्तरित आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)