निगडी, तळेगावातील चौघांना अटक

– अलिबागमध्ये तीन मोठ्या हॉटेलवर छापा

पिंपरी – रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अलिबाग येथील तीन मोठ्या आलिशान हॉटेलवर छापा मारला असून यामध्ये निगडी आणि तळेगाव मधील चौघांसह सात जणांना अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.27) करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये तळेगाव येथील 28 वर्षीय व निगडी येथील 38 वर्षीय महिला त्यांचा वाहन चालक विश्वनाथ ठाकर (वय-25, रा. मालेगाव, ता. मावळ), शिवाजी शिंदे (वय-32, रा. अंकुश चौक, निगडी), हॉटेल चालक प्रसाद रमेश नागवेकर (वय-38, रा. हॉटेल विठोबा-रुक्‍मिणी कॉटेज, अलिबाग बायपास रोड, अलिबाग), निलेश राजाराम राऊळ (वय-40, रा. नागाव, अलिबाग), मिथुन नित्यानंद कामथ (वय-32, मारुती नाका, अलिबाग) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग शहराच्या बाहेरून मुली आणि महिलांना पर्यटनाच्या नावाखाली आणून त्यांच्यामार्फत अवैधरित्या वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना मिळाली. पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जमील अहमद शेख यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार शेख यांनी माहिती मिळवून हॉटेल विठोबा-रुक्‍मिणी कॉटेज, हॉटेल रविकिरण आणि हॉटेल मीरा-माधव या तीन हॉटेल्सवर छापा टाकला. यामध्ये दोन महिला, दोन वाहन चालक आणि तीन हॉटेल चालकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना 1 नोव्हेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच पीडित महिलांना कर्जत येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)