निगडी गावठाण परिसरात “पाणीबाणी’

नागरीक चिंतेत : महापालिका पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

पिंपरी – महापालिका हद्दीतील पाणी पुरवठा महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाने (एमआयडीसी) विस्कळीत केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींनी विचारल्यास पाणी कपात करण्याची भिती एमआयडीसी घालत आहे. त्यासंदर्भात पालिकेने एमआयडीसीला पत्र पाठवले असून अद्याप उत्तर दिले नाही.

-Ads-

पिंपरी-चिंचवड पाणी पुरवठा योजनेला महापालिका हद्दीत विविध व्यासाच्या 12 नलिका जोडल्यात. त्याद्वारे प्रतिदिन 30 एमएलडी पाणी पुरवठा होतो. निगडी गावठाण, केएसबी चौक, बजाज ऑटो, मोरवाडी, भोसरी पंप, गवळी माथा, लांडेवाडी भागाला पाणी दिले जाते. येथील सुमारे दहा हजार नागरीक एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. एमआयडीसीने कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही.

याबाबत एमआयडीसीला विचारल्यास विविध कारणे सांगितली जातात. शहराच्या ठरावीक टप्प्यातील बगीचे, उद्यान, रोप वाटिका, बांधकाम आदींना पाण्याचा वापर होत असल्याचे उघड झाल्यानंतर एमआयडीसी आणि पालिका यांच्यात 8 नोव्हेंबर 2017 रोजी पत्र व्यवहार झाला. त्यानुसार मैला शुध्दीकरण केंद्रातील पाणी तेथे वापरल्यास पिण्याचे पाणी बचत होईल, असे पालिकेला सूचित केले, मात्र पालिकेने आजतागायत ही बाब गांभिर्याने घेतली नाही.

पिंपरी-चिंचवड आणि चाकण औद्योगीक क्षेत्रात वाढीव पाण्याची मागणी आहे. त्यासाठी एमआयडीसी प्रयत्न करीत आहे. पालिकेने मैला शुध्दीकरण केंद्रातील पाण्याचा वापर केल्यास वाचलेले पाणी औद्योगीक क्षेत्राला देता येईल. मात्र, एमआयडीसीला याबाबत पालिकेने काहीहि कळवले नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्यात काटकसर करावी, अन्यथा पाणी पुरवठ्यामध्ये नाईलाजाने कपात करावी लागेल, अशी सक्‍त सूचना एमआयडीसीने देखील पालिकेला दिली आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून होत असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)