निगडीमध्ये होणार अखिल भारतीय जैन युवक संमेलन

निगडी-  अखिल भारतीय जैन सोशल ऑर्गनायझेशनच्या पाचव्या अखिल भारतीय जैन युवक संमेलन निगडीमध्ये होणार आहे. प्राधिकरणातील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने संमेलनाचे आयोजन शनिवारी व रविवारी (दि. 6 व 7 ऑक्‍टोबर) करण्यात आले आहे, अशी माहिती निमंत्रक नितीन बेदमुथा यांनी दिली आहे.
निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे शनिवारी सकाळी नऊ वाजता संमेलनाचे उद्‌घाटन उद्योजक प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष पदी मनोहरलाल लोढा असणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राजू सांकला, प्रकाश पारख, विजयकांत कोठारी, पोपट ओस्तवाल, बाळासाहेब धोका, सुनिल नहार, प्रा. अशोक पगारिया, सुरेश गादीया, मोहन संचेती, सुरेश शेठीया आणि जैन सोशल ऑर्गनायझेशनचे शहराध्यक्ष तुषार मुथ्था, कार्याध्यक्ष पवन लोढा आदी उपस्थित राहणार आहेत.

पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त कोटा संघ प्रमुख नवकार आराधिका प.पू.प्रतिभाकुंवरजी म.सा. प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम सुरु आहेत. प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या संमेलनात अखिल भारतीय जैन सोशल ऑर्गनायझेशनचे देशभरातून पाचशे व राज्यातून दोनशे असे एकूण सातशे युवक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

-Ads-

उपस्थितांना संजय रावत (अहमदाबाद), राकेश जैन (इंदोर), कमल आचलिया (रायचूर) हे तज्ज्ञ “सेवा, शिक्षा, संघटन’ “एक कदम गुरु दरबार की ओर एक कदम जैनत्व की ओर’ “देशप्रेम भारतीय संस्कृती’ “उद्योग धंद्यामध्ये प्रगती’ या विषयांवर मार्गदर्शन व्याख्यान देणार आहेत. तसेच बुधवारी (दि. 10 ऑक्‍टोबर) प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी नऊ वाजता विशेष धार्मिक कार्यक्रमांचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुखलाल लोढा, मनोहरलाल लोढा, पवनकुमार लोढा, नितेशकुमार लोढा, पृथ्वीराज लोढा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमांना पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, रायगड, मुंबई येथूनही ज्येष्ठ जैन, बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. अशीही माहिती संमेलनाचे निमंत्रक नितीन बेदमुथा यांनी दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)